आयफामध्ये रणबीर ठरला सर्वोत्कृष्ट

अभिनेता रणबीर कपूरने आणखी एक मानाचा पुरस्कार मिळवला असून त्याच्या ‘बर्फी’ सिनेमातील मुकबधीर मुलाच्या भूमिकेसाठी आयफा-२०१३चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यासोबतच ‘कहानी’ चित्रपटातील पतीचा शोध घेत असलेल्या गरोदर स्त्रीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री विद्या बालनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. दीपिका-रणबीरच्या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देण्यात आला. तर गौतम आणि आयुष्यमान खुरानाला ‘विकी डोनर’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमधील सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार मिळाला.

आयफा-२०१३ च्या’ पुरस्का्र वितरण सोहळ्यास बॉलीवूडमधील अभिषेक बच्च‍न, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, प्रभूदेवा, दीपिका पूदकोन आणि सुशांत सिंग राजपूत या मंडळीनी हजेरी लावली. त्यासोबतच त्यानी यावेळी परमार्फस सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी अभिषेक बच्चनकडून विद्या बालनने पुरस्कार स्वीकारला. ‘बर्फी’मध्ये मुकबधीर मुलाची भूमिका करणारा रणबीर कपूर मात्र यावेळेस पुरस्कार स्वीकारण्यास उपस्थित नव्हता. त्यामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेता पदाचा पुरस्कार चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू यांनी रणबीरच्यावतीने स्वीकारला.

यापूर्वी रॉकस्टार या सिनेमासाठी अभिनेता रणबीरला तर डर्टी पिक्चरसाठी विद्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे. बॉलीवूडमधील ‘अग्नीपथ’, ‘विकी डोनर’ आणि ‘गॅंग ऑफ वासेपूर’ या चित्रपटांना मागे टाकून अनुराग बासूच्या प्रणयरम्य-विनोदी ‘बर्फी’ चित्रपटाने वर्षभर अनेक पुरस्कार जिंकले आहेत. मानाचा आणखी एक पुरस्कायर मिळवून अभिनेता रणबीर कपूरने या वर्षभरात सवार्धिक पुरस्कार मिळवले आहेत.

Leave a Comment