फ्रान्सच्या बार्तोलीने मिळवले पहिले ग्रँड स्लॅम

लंडन- विम्बल्डन टेनीस स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद फ्रान्सच्या मारियन बार्तोलीने पटकावले. टेनिसच्या कारकीर्दीतले बार्तोलीचे हे पहिले ग्रँड स्लॅम आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बार्तोलीने जर्मनीच्या सबिन लिसिकीचा दोन सरळ सेट्समध्ये धुळ चारली. या अंतिम फेरीत बार्तोलिने लिसिकीचा ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये. पराभव केला. फ्रान्सच्या अमेली मॅरिस्मोनंतर विम्बल्डनचे टायटल जिंकणारी बार्तोली ही पहिली फ्रेन्च खेळाडू ठरली आहे.

विम्बल्डनची दुस-यांदा अंतिम फेरी गाठणा-या फ्रान्सच्या मारियन बार्तोलिने कारकीर्दीतील सर्वोत्तरम कामगिरी करताना पहिल्यांदा विजय मिळवला. यापूर्वी तिने २००७ मध्ये विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. त्या वेळी तिला अंतिम फेरीत विनस विल्यम्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या सामन्यात चूकांची पुनरावती टाळत विम्बलडनेचे जेतेपद पटाकाविले आहे.

यापूर्वी मारियन बार्तोलीने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची उप उपांत्य फेरी गाठली होती, तर २०११ मध्ये फ्रेन्च ओपनच्या उपांत्य फेरीत तीचे आव्हान संपुष्टात आले होते. २०१२ मध्ये युएस ओपनच्या उप उपांत्य फेरीतून बार्तोलीला गाशा गुंडाळावा लागला होता. पण यंदा मात्र तीने विम्बल्डन टायटल जिंकत टेनिस कारकीर्दीतल्या आपल्या पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम विजयाची नोंद केली. त्यानचया या विजयामूळे विम्बल्डन टेनीस स्प२र्धेला नवा विजेता मिळाला आहे. तिच्या या विजयी कामगिरीनंतर फ्रान्समध्ये जल्लोष करण्यात आला.

Leave a Comment