प्रेमाचा वेगळा अनुभव

प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्‍नाचे नेमके उत्तर आपल्याकडे नसले तरी बॉलिवुडच्या चित्रपटातून प्रेमाची विविध रूपे आपल्यला बघायला मिळाली आहेत. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी ‘लुटेरा’द्वारे नविन प्रकारची प्रेमकथा घेऊन आला आहे. ‘लूटेरा’ची लव्हस्टोरी बॉलिवुडच्या नेहमीच्या पठडीत न बसणारी आहे. विक्रमादित्य मोटवाणीच्या लुटेराचा काळ 60 च्या दशकाच्या सूरूवातीचा आहे. पश्चिम बंगालच्या मणीपूरमधील ही कथा आहे.. पाखी रॉयचौधरी (सोनाक्षी सिन्हा) एक सुंदर मुलगी आपल्या वडिलांसोबत त्या गावात राहत असते. पाखीचे वडील जमीनदार आहेत. वरुण श्रीवास्तव (रणवीर सिंग) आणि त्याचा मित्र देव (विक्रांत) हे दोघेही चोर आहेत. छोट्या मोठ्या घरांमध्ये चोरी करणे हे त्यांचे काम.

लोकांना लुटण्याच्या निमित्ताने ते मणीपूरमध्ये येतात. गावात आल्यानंतर पाखी आणि वरुण एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्या दोघांचे लग्नही ठरते, मात्र त्याचवेळी हा वरुण त्यांच्या साखरपुड्यदिवशी पाखीच्या वडिलांची सगळी संपत्ती घेउन पळून जातो. हा धक्का सहन न झाल्याने पाखीच्या वडिलांचा मृत्यू होतो. परंतु, पुन्हा एकदा संयोगाने पाखी आणि वरुणची भेट होते आणि त्यानंतर काय घडते हे जाणुन घेण्यासाठी लुटेराचा आनंद मोठ्या पडद्यावरच घ्यायला हवा लेखक, सहाय्यक दिग्दर्शक, साऊंड डिझायनर, कोरिओग्राफर अशा विविध जबाबदार्‍या सांभाळणार्‍या विक्रमादित्यची चित्रपट माध्यमावर जबरदस्त पकड असल्याचे लुटेराच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांने दिग्दर्शित केलेल्या ’उडान’ला व्यावसायिक यश मिळाले, तसेच कान्समध्येही त्याची दखल घेतली गेली होती. चित्रपटाच्या कथेला फारसा वेग नसला तरी प्रेक्षक कथेशी एकरूप होउन गुंतुन राहतात. चित्रपटात पात्रांचा जास्त भरणा नाही. ही कथा फक्त पाखीआणि वरूण भोवतीच गुंफण्यात आली आहे. नायिकेचे नायकावर खूप प्रेम आहे, मात्र नंतर ती त्याचा द्वेष करते. कथा शेवटाकडे वळताना आपल्या मनातसुद्धा नायकाविषयी सहानुभूती निर्माण होऊ लागते. विक्रमादित्य मोटवानी यांनी या कथेची मांडणी फारच सुंदर पद्धतीने केली आहे.

चित्रपटाच्या नावावरून ’लुटेरा’ नायकप्रधान आहे वाटते मात्र प्रत्य्क्षात लुटेराचा केंद्रबिंदू पाखी आहे. टायटल फक्त वरूणचे व्यक्तीमत्व दाखवते. पाखीच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हाची निवड खूप विचारपूर्वक करण्यात आली आहे. बरुण चंदा यांनी पाखीच्या वडीलांची भूमिका उत्तम साकारली आहे. तसेच महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असलल्या रणबीरचाही अभिनय सुंदर झाला आहे. आपण रणवीरला आत्तापर्यंत खट्याळ भूमिका साकारताना बघितले आहे. रणवीरच्या अभिनयाची ही बाजू देखील आहे, यावर आपला विश्वासच बसत नाही. सोनाक्षी – रणबीरची केमेस्ट्री छान जुळली आहे.

लुटेराला अमित त्रिवेदी याने सुंदर संगीत दिलंय. यातील सवांर लू हे गाणे हीट ठरले आहे. मोन्ता रे, शिकांयते, ही गाणी फारच सुंदर आणि गुणगुणावीशी वाटणारी अशी आहेत. सुंदर कथा, वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, निसर्गरम्य वातावरण, उत्कृष्ट कॅमेरा वर्क असलेला प्रेमाचा वेगळा अनुभवायला हवाच असा आहे.

चित्रपट – लुटेरा
निर्मिती – :एकता कपूर, अनुराग कश्यप, विकास बहल, मधु मटेंना,
दिग्दर्शक – विक्रमादित्य मोटवानी
संगीत – अमित त्रिवेदी
कलाकार – रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा

रेटिंग – * * *

Leave a Comment