सांगली निवडणूकीच्या निमित्ताने आघाडीत बिघाडी

सांगली- सांगली पालिकेच्या निवडणूकीत एकमेंकावर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या सांगली पलिकेच्या निवडणूकीच्या‍ निमित्तानने आघाडीत बिघाडी झाली आहे. दोन्ही कॉग्रेसकडून एकमेकावर चिखलफेक केली जात आहे. या निवडणूच्या प्रचारासाठी दोन्ही कॉग्रेसचे नेत्यांनी सभा घेतल्या व एकमेकावर तुफानी आरोप केले आहेत. त्या‍मुळे हे सर्वजण सत्तेत एकत्र आहेत की नाही असा सवाल सर्वसामन्याना पडला आहे.

या प्रचारासाठी सांगलीत आतापर्यंत मुख्यमंत्री पथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, नारायण राणे, माणिकराव ठाकरे भाजपकडून गोपीनाथ मुंडे, देवेंद फडवणीस यांच्या सभा झाल्या. या सभांना गर्दी होत आहे. काँग्रेसचे नेतृत्व आणि सोनिया गांधींवरील टीका थांबवा अन्यथा आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला. निवडणुकीच्या प्रचारासाठी नारायण राणे यांच्या तीन सभा झाल्या. या निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी सोनिया गांधी नेमक्या कोणत्या गावच्या आहेत? असा प्रश्न केला होता.

यापुढे काँग्रेसचे नेतृत्व आणि सोनिया गांधी यांच्यावर टीका करण्याचे थांबवा, अन्यथा आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल, असाही इशारा राणे यांनी दिला. तर आर. आर. पाटील गुंडासोबत बसत असल्याचा आरोप त्यानी केला. उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर टीका करत जनतेतून निवडून यावे असे आव्हान दिले. तर माणिकराव ठाकरे यांनी जयंत पाटील कॉग्रेस प्रवेशासाठी आले असल्यचा आरोप करून रान पेटविले आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपामुळे गेले आठ दिवस नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक झाली.

Leave a Comment