मैदानातच जडेजा-रैनामध्ये वाद

जमैका: गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियातल्या प्रमुख खेळाडूमध्ये काही तरी मतभेद आहेत, अशी चर्चा मिडीयात रंगली असतानाच शुक्रवारी झालेल्या विंडीजविरुद्धच्या सामन्यादरम्यान, रविंद्र जाडेजा आणि सुरेश रैना या दोघांमध्ये मैदानातच खडाजंगी पहायला मिळाली. यावेळी जडेजाच्या गोलंदाजीवर रैनाने झेल सोडल्याने निराश झालेला रवींद्र जडेजा त्याच्या अंगावर धावून गेला. यावेळी इतर खेळाडूनी मध्यस्थी केल्याने हा वाद निवळला.

यंदाच्या आयपीएल स्पेर्धेवेळीच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात उडालेले खटके आजही डोळ्यासमोर आहेत. या आठवणी अजूनही ताज्या असतानाच जाडेजा आणि रैनामध्ये उघडपणे झालेला वाद हा टीम इंडियात काहीतरी बिनसले असल्याचे संकेत देत आहे. काहीदिवसांपूर्वी संघात वरिष्ठे व कनिष्ठे खेळाडू असे दोन गु्प पडले असल्यानची चर्चा होती. मात्र या वादावरून आता दोन गट असल्यावची चर्चा आहे.

झेल सोडल्यानतर जाडेजा चक्क रैनाच्या अंगावर धाऊन गेलेला दिसला.यांच्यामधील भांडणाचे नेमके कारण मात्र कळाले नाही. पण जाडेजाच्या गोलंदाजीवर रैनाने झेल सोडल्यामुळे नाराज जाडेजाकडून असे कृत्य घडल्याचे दिसून आले. टीम इंडियाच्या विजयानंतर सर्वजण हसत-हसत मैदानाबाहेर पडले.

Leave a Comment