सुपर’स्टार’च्या डान्सचा धूम धडाका

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील “इंडिया डान्सिंग सुपरस्टार” या रियालिटी शोमध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांना मानवंदना दिली जाणार आहे. आता या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांच्या यादीमध्ये किंग खानचे नाव असणारच.या शोमध्ये आमिर, शाहरुख, सलमान, सैफ अली खान यांच्या सुपर डुपर हिट झालेल्या गाण्यावर डान्स सादर होणार आहेत. डेहाराडूनचा डी – मनैक्ष हा स्पेशल डान्स करणार आहे.

एम. ज़े ५ त्याच्या आवडत्या अभिनेत्याला म्हणजे ह्रितिक रोशनला त्याच्या खास शैलीत ट्रिब्युट देणार आहे. पद्मिनी आणि देबाशिष गीता कपूरची स्टाईलची झलक आपल्या नृत्यातून दाखवणार आहेत. विकास सावंत बिग बी अमिताभ बच्चन यांचा एव्हर ग्रीन डान्सफॉर्म प्रेक्षकांना दाखवणार आहे. आणि हो साऊथ इंडियन सुपर स्टार किंग रजनीकांत सुद्धा असणार आहे. लोयेला ड्रीम टीम रजनीकांतचा डान्स सादर करतील. सुभारानील पाउल मराठमोळ्या ‘धक धक गर्ल’ माधुरीच्या गाण्यावर थिरकणार आहे. सुपर कुल रितेश देशमुख ही स्पर्धकांसह डान्सची मजा लुटणार आहे. असा हा ऑल सुपरहिट डान्स या विकेंडला रात्री ९ वाजता स्टार प्लस वर प्रक्षेपित होणार आहे.

Leave a Comment