साखरेवरील आयात शुल्कात वाढ

मुंबई दि.५ – मागणी पेक्षा अधिक असलेला पुरवठा आणि स्थानिक बाजारात साखरेच्या उतरत असलेल्या किमती लक्षात घेऊन सरकारने साखर आयात शुल्क १५ टक्कयांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. या अगोदर साखरेवरील आयात शुल्क १० टक्के इतके होते. आयात शुल्कातील वाढीमुळे देशातील साखर उद्योगाला थोडा दिलासा मिळू शकणार आहे.

जगातील सर्वाधिक साखर वापरणार्‍या देशात भारताचा क्रमांक पहिला आहे तसाच साखर उत्पादनातही भारत आघाडीवर आहे. मात्र देशात कोसळत चाललेल्या साखर दरांमुळे साखर उत्पादक अडचणीत आले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी कालच अन्न, अर्थ आणि कृषी मंत्रालयांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अर्थात हा आदेश अर्थमंत्रालयाकडून अद्याप अधिकृतरित्या आलेला नाही. तो लवकरच जारी केला जाईल असे या विषयाशी संबंधित वरीष्ठ अधिकार्‍यानी सांगितले.

Leave a Comment