दुष्काळग्रस्तांना ८७ कोटीची मदत

बीड – मराठवाडयातील दुरूकाळग्रस्तांना शासनाने मदत देण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प़ायात बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतक-याना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातिल शेतक-यांना ८७ कोटीची मदत मिळणार आहे. बीड जिल्ह्यातिल पन्नास पैसे पैसेवारी असणा-या सहाशेहून अधिक गावातील लाखो शेतक-यांना त्याचा फायदा होणार आहे. ही रक्कपम आगमी काळात त्यांच्या बॅक खत्यावर जमा होणार आहे.

गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातील निम्या भागात दुष्काळाचे सावट होते. जिल्ह्यात पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिके वाया गेली होती. अनेक ठिकाणी दुष्काळामुळे पेरण्याही होऊ शकल्या नव्हत्या. जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि हाताला काम देण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते या दुष्काळानंतर दुष्काळात पिचलेल्या शेतक-याला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात पन्नास पैसे पैसेवारी असणा-या दुष्काळाने बाधित गावातील शेतक-यांना ही मदत केली जाणार आहे.

बीड जिल्ह्यासाठी ८७ कोटी पन्नास लाख रुपये या बळीराजाच्या मदतीसाठी उपलब्ध होणार आहेत.
बीड जिल्ह्यातील ६८५ गावांची पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे बँक खात्यात जमा होणार ही मदत जिल्हा प्रशासनाने थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करावी. या मदत वाटपासाठी खास मोहीम आखून चालू खरीप हंगामात मदतीचे वाटप पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . दुष्काळी परिस्थितीतून सावरलेल्या जिल्ह्यातील शेतक-यांना ही मदत उपयोगी ठरणार आहे.

Leave a Comment