थाळीफेकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक

पुणे : पुणे येथील बालेवाडी मैदानावर खेळल्या जात असलेल्या विसाव्या आशियाई अॅथलेटिक्समध्ये भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. गुरूवारी थाळीफेकमध्ये विकास गौडाने भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. त्यावच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी आता एकूण चार पदके जमा झाली आहेत.

यापूर्वी देखील विकास गौडाने दमदार कामगिरी केली होती. त्यामने यापूर्वी २००५ आणि २०११ साली या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर २०१० च्या एशियन गेम्समध्ये कांस्य पदक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक मिळवले होते. त्यामुळे या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत विकास गौडा सुवर्णपदकाची कमाई करुन देईल, अशी भारतीय चाहत्यांना वाटत होते.

आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत दुसरीकडे ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या पुवम्नाने रौप्यपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत पुवम्माने ५३. ३७ सेकंदांची वेळ नोंदवली. त्यामुळे भारताच्या खात्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी आता एकूण चार पदके जमा झाली आहेत.

Leave a Comment