डॉक्टरांनी मंडेलांची आशा सोडली

जोहान्सबर्ग दि.५ – दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी मंडेलांची प्रकृती अधिकाधिक ढासळत चालली असल्याचे व त्यांच्या जीवनाची आशा उरली नसल्याचे मान्य केले आहे .त्याचबरोबर मंडेला यांची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढून टाकण्याबाबत विचार करावा अशी विनंती मंडेला यांच्या कुटुंबियांना केली आहे.

मंडेला गेले कित्येक दिवस कृत्रिम श्वाच्छोश्वासावर असून त्यांच्या यातना आणखी वाढविण्यात कांही अर्थ उरलेला नाही असे डॉक्टरांनी मंडेला यांच्या कुटुंबियांना कळविले असल्याचे न्यायालयातून मिळालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे. या कागदपत्रांतूनच ९४ वर्षीय मंडेला मृत्यूच्या किती निकट आहेत याचीही माहिती प्रथमच उघड झाली आहे. मंडेला यांच्या कुटुंबियांच्या वकीलानी हे कागदपत्र जाहीर केले आहे.

मंडेला यांची पत्नी, तीन मुली व कुटुंबातील अन्य १५ सदस्य डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या विनंतीवर विचार करत असल्याचेही या वकीलांचे म्हणणे आहे.

Leave a Comment