टीम इंडियाला आज शेवटची संधी

पोर्ट ऑफ स्पेन – तिरंगी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी शुक्रवारी टीम इंडियाला वेस्ट इंडीजशी झुंजावे लागणार आहे. हा सामना टीम इंडियाने बोनस गुणासह जिंकला तरच या मालिकेतील आव्हान कायम राहणार आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीती टीम इंडियाला जाणवत आहे. त्यामुळे ही लढत टीम इंडियासाठी ‘करो या मरो’च ठरणार आहे.

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील दणदणीत विजय मिळविले. या तिरंगी मालिकेत मात्र टीम इंडियाची कामगिरी घसरली आहे. वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेसोबतचे सामने टीम इंडियाने मोठ्या फरकाने गमावले. यामुळे टीम इंडियाचे स्पर्धेतील स्थान धोक्यात आले आहे. यापुढील स्पर्धेतील उर्वरित दोन सामने त्यांना बोनस गुणांसह जिंकता आल्यास त्यांचा स्पर्धेतील ‘कमबॅक’ शक्य आहे.
टीम इंडियाला सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये मोठे पराभव पत्करावे लागले आहेत. शुक्रवारी वेस्ट इंडीजसोबत होणा-या सामन्यात टीम इंडियावर दबाव असणे साहजिक आहे. पण यातून मार्ग काढण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.

शुक्रवारचा सामना जिंकल्यास टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान कायम राहील व अंतिम फेरीत स्थान मिळवणे त्यांना सोपे होऊ शकते.
फलंदाजीत रोहित शर्मा वगळता कोणीही या स्पर्धेत अर्धशतकी खेळी करू शकलेले नाही. गोलंदाजांनाही श्रीलंकन फलंदाजांनी चांगलेच चोपल्याने त्यांच्यावर संघाला फार निर्भर राहता येणार नाही. ख्रिस गेल हा कायमच प्रतिस्पर्धी संघाला चिंतेत टाकतो. शुक्रवारी त्याची बॅट चालल्यास हिंदुस्थानची विजयाची वाट काहीशी खडतर ठरू शकते. त्या मुळे या सामन्याीतून पुन्हां एकदा टीम इंडियाला पुनरागमन करावे लागणार आहे.

Leave a Comment