टाइम प्लीज ! च्या संगीताचे थाटात प्रकाशन

एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टाइम प्लीज ! लव्ह स्टोरी….लग्नानंतरची या चित्रपटाच्या संगीताचे प्रकाशन पुणे येथे करण्यात आले. या अभिनेते सिध्दार्थ जाधव, सई ताम्हणकर, संगीत दिग्दर्शक ऋषीकेश कामेरकर, गायक नेहा राजपाल, जसराज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक समीर विद्ध्वंस, तसेच कथा पटकथा, संवादलेखक व गीतकार क्षितीज पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थिीतीत हा सोहळा पार पाडला. ‘टाइम प्लीज ! लव्ह स्टोरी…. लग्नानंतरची या मराठी चित्रपटाची कथा इतर चित्रपटांप्रमाणे लग्नाआधीची कथा नाही, तर लग्नानंतरची आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात 26जुलै 2013 रोजी प्रदर्शित होत आहे.

एव्हरेस्ट एन्टरटेन्में टच्या संजय छाब्रिया यांचा हा मनोरंजनपर चित्रपट आहे. या रोमांचक अशा नाट्यमर चित्रपटामध्ये उमेश कामत, प्रिया बापट, सई ताम्हणकर आणि सिध्दार्थ जाधव यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. नव्याने लग्न झालेले जोडपे आपल्या नवीन आयुष्यातील लवचिक आनि आव्हानात्मक दिवसांना कसे सामोरे जाते आणि त्यावर कशी मात करते, याची कथा या चित्रपटात साकारली गेली आहे. जमवून केलेल्या लग्नांमध्ये जी बदलती परिस्थिती उभी राहते, ती विनोदी आणि मनोरंजक पध्दतीने येथे साकारली गेली आहे. वंदना गुप्ते, सीमा देशमुख आणि माधवी अभ्यंकर या इतरही कलाकारांच्या भूमिका यात आहेत. प्रतिसाद प्रॉडक्शनचे अनिष जोग आणि 24 कॅरेट एन्टरटेन्मेंटचे सौरभ गाडगीळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवाद क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. ऋषीकेश कामेरकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.

Leave a Comment