अखेर अन्न सुरक्षा अध्यादेश लागू

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या अन्न सुरक्षाअध्यादेशावर शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली.यामुळे हा अध्यादेश आजपासून लगू झाला आहे. जगातील हा सर्वात मोठा अन्नसुरक्षा कार्यक्रम असून, केंद्र सरकार या योजनेला एक लाख 25 हजार कोटींचेअनुदान देणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अध्यादेशाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीहोती. त्यानंतर गुरुवारी हा प्रस्ताव राष्ट्रपतींपुढे ठेवण्यात आला.रात्री दहा वाजता प्रस्ताव पोहचल्याचे राष्ट्रपतींच्या सचिवांनी सांगितले. मात्र त्यावेळी राष्ट्रपती कानपूर आयआयटी दौ-यावर होते. तेशुक्रवारी सकाळी राष्ट्रपती भवनात पोहचले. त्यानंतर राष्ट्रपती मुखर्जीयांनी कायदेशीर सल्ला घेऊन अखेर प्रस्तावावर सही केली आणि हा अध्यादेशलागू झाला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत हा अध्यादेश केंद्र सरकारला मंजूर करुन घ्यावा लागेल. या विधेयकामुळे देशातील दारिद्रय रेषेखालील जनतेला महिन्याला पाच किलो धान्य अत्यंत माफक दरात मिळण्याची हमी मिळणार आहे. महिन्याला पाच किलो तांदूळ, गहू, आणि भरडधान्य हे प्रत्येकी तीन, दोन आणि एक रुपया या निश्चित किंमतीला मिळणार आहे.

अध्यादेश लागू होताच लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर ट्विट करुन काँग्रेसवर टीका केली. देशात अन्न सुरक्षेसाठी पुरेशी तरतूद नाही. धान्य सडून वाया जाऊ नये म्हणून गरीबांना वाटण्यात यावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले. सरकार लवकर निवडणूक घेण्याचा विचार करत आहे. यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घाईघाईत अन्न सुरक्षा अध्यादेश लागू करुन मतदारांना फसवण्यासाठी रचलेला हा एक कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मात्र त्यांचे हे खोटे आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. लवकर निवडणूक घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून विरोधकांकडे टिका करण्यासाठी काहीच
पर्याय नसल्याने ते उगाचच उर बडवून डांगोरा पिटत आहेत, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.यासाठी 23 हजार कोटी रुपयांचा अतिरीक्त खर्च होणार असला तरी यामुळे कुपोषण कायमचे नष्ट होईल.

हे विधेयक देशातील गरीब जनतेसाठी असल्याचे अजय माकन आणि जी. बी. थॉमस यांनी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या विधेयकामुळे देशातील दारिद्रय रेषेखालील जनतेला महिन्याला पाच किलो धान्य अत्यंत माफक दरात मिळण्याची हमी मिळणार आहे. महिन्याला पाच किलो तांदूळ, गहू, आणि भरडधान्य हे प्रत्येकी तीन, दोन आणि एक रुपया या निश्चित किंमतीला मिळणार आहे.

अध्यादेश लागू होताच लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर ट्विट करुन काँग्रेसवर टीका केली. देशात अन्न सुरक्षेसाठी पुरेशी तरतूद नाही. धान्य सडून वाया जाऊ नये म्हणून गरीबांना वाटण्यात यावा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केले. सरकार लवकर निवडणूक घेण्याचा विचार करत आहे. यासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घाईघाईत अन्न सुरक्षा अध्यादेश लागू करुन मतदारांना फसवण्यासाठी रचलेला हा एक कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मात्र त्यांचे हे खोटे आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. लवकर निवडणूक घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून विरोधकांकडे टिका करण्यासाठी काहीच
पर्याय नसल्याने ते उगाचच उर बडवून डांगोरा पिटत आहेत, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.