हनी सिंग अडचणीत

पंजाबी रॅप साँग्जबद्दल प्रसिद्ध असलेल्या ‘यो यो हनी सिंग’विरोधात अश्लील गाणी गायल्याबद्दल पंजाब हरियाणा हायकोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘मै हूँ बलात्कारी’ या अश्लील गाण्याबद्दल हनी सिंगविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हे आक्षेपार्ह गाणं आपण गायलंच नसल्याचा दावा हनी सिंगने केला आहे. हनी सिंग नावाच्या दुसऱ्याच एका गायकाने हे गाणं गायलं असल्याचं हनी सिंगने म्हटलं आहे. फेब्रुवारी २००८ रोजी युट्युबवर हे गाणं अपलोड झालं होतं. मै हूँ बलात्कारी या गाण्याचा गायक कोण आहे हे मला माहितीच नसल्याचं हनी सिंगने महटलं आहे. या गाण्यातील शब्दांचा हनी सिंगने तीव्र सब्दांत निषेध व्यक्त केला. या गाण्यासाठ आपलं नाव वापरल्याबद्दल खुद्द हनी सिंगनेही तक्रार केल्याचं म्हटलं आहे. सेंसॉर बोर्डाने या गाण्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. हनी सिंगसोबतच गिप्पीगरेवाल, अमर चमकीला, दिलजीत दोसांझ, अशोक मस्ती आणि गीता झैलदार या गायकांविरोधातही अश्लील गाण्यांबद्दल तक्रार करण्यात आली
आहे. ‘हेल्प’ नामक एनीओने ही तक्रार केली आहे.

Leave a Comment