व्हेस्पा व्हीएक्स भारतात सादर- किंमत ७२ हजार रूपये

नवी दिल्ली दि.५ – इटालियन दुचाकी उत्पादक कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित व्हेस्पा व्हीएक्स भारतात सादर केली. देशातील ही सर्वात महाग स्कूटर असून तिची किंमत ७१३८० रूपये (एक्स शोरूम) आहे.

नवी व्हेस्पा व्हीएक्स भारतीय वातावरण, ग्राहकांची आवड लक्षात घेऊन बनविली गेली असल्याचे कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक रवि चोप्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की १२५ सीसी क्षमतेची ही स्कूटर फ्रंट डिस्क ब्रेक आणि ट्यूबलेस टायर अशा नव्या फिचरसह सादर केली गेली आहे. युरोपियन आणि अमेरिकन मार्केटमध्ये व्हेस्पा स्कूटर अतिशय लोकप्रिय आहेतच पण भारतातही या गाड्याना चांगली मागणी आहे.

व्हेस्पा एलएक्स या मूळ मॉडेलवरच नवीन व्हेस्पा एसएक्स आधारलेली आहे. नवी स्कूटर चालकाला रायडिंगचा अनोखा अनुभव देईल असा कंपनीचा दावा आहे. तरूण वर्गाला समोर ठेवून नवे मॉडेल बनविले गेले असल्याचेही सांगितले जात आहे.