विल्यम्स केटच्या बाळाला अपहरणाचा धोका

लंडन दि.४ – ब्रिटीश राजघराण्याचा नवा वारस आता कोणत्याही क्षणी जन्मास येणार असताना प्रिन्सेस डायनाचा माजी बॉडीगार्ड वयेन व्हार्फ याने या बाळाचे अपहरण केले जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. या बाळासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करावी लागेल आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी लाखो पौंडांचा खर्च आईवडिलांना करावा लागेल अशी भीती त्याला वाटते आहे.

प्रिन्सेस केट बाळाला जन्म दिल्यानंतर माहेरी बाळंतपणासाठी जाणार आहे. तिचे वडील मायकेल मिडलटन यांची बर्कलबेरी भागातील बर्कस येथे मोठी मालमत्ता असून केट तेथेच राहणार आहे. मात्र पन्नास लाख पौंड किमत असलेली ही प्रचंड मालमत्ता केटच्या बाळासाठी सुरक्षित नाही असे व्हार्फचे म्हणणे आहे.

तो म्हणतो, २० वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती आता नाही. जग फार बदलले आहे. प्रिन्स विलिम्स व हॅरी यांना २० वर्षांपूर्वी जेव्हा बाहेर नेले जायचे त्यावेळी थोडी सुरक्षा पुरेशी असायची. मात्र आता ती परिस्थिती नाही. या दांपत्याच्या बाळाला जन्मापूर्वीच मिळालेला राजकीय दर्जा आणि जगभरात रॉयल र्फमिलीबद्दल असलेले औत्सुक्य व आकर्षण यामुळे बाळाच्या अपहरणाचा धोका मोठा आहे.

Leave a Comment