झिम्बाब्वे दौ-यासाठी उद़या टीम इंडियाची निवड

मुंबई- आगामी काळात टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौ-यावर जाणार आहे. या दौ-यात टीम इंडिया पाच वनडे सामने खेळणार आहे. या दौ-यासाठी भारतीय संघाची घोष्णा शुक्रवारी मुंबईत होत असलेल्याव निवड समितीच्या बैठकीनंतर करण्यात येणार आहे्. या दौ-याला २४ जुलैपासून हरारेत सुरुवात होईल. या मालिकेसाठी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग ढोणी उपलब्ध असणार की नाही याबाबत अनिश्चचतता आहे.

आगामी काळात भारत दौ-यावर ऑस्ट्रेलियाचा संघ येणार आहे. या सात सामन्यांची मालिका पाहता झिम्बाब्वेच्या छोटेखानी दौ-यासाठी कर्णधार ढोणीला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. या दो-यात युवा क्रिकेटपटूंना संधी देण्याचा निवड समितीचा स्पष्ट इरादा असला तरी नियोजित कर्णधार ढोणीची उपलब्धता आणि निवडीबाबत संदीप पाटील आणि सहका-यांच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

गेल्या दोन सामन्यात टीम इंडियाची कामगिरी खराब झाली असल्याने या बैठकित याविषयावर देखील चर्चा होणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेदरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे ढोणी उर्वरित स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या अनुपस्थितीत विराट कोहलीकडे भारताची सूत्रे सोपवण्यात आलीत. तसेच ढोणीच्या बदली अंबाती रायडूला संधी मिळाली आहे. त्यामुळे आता आगामी काळात टीम इंडियात काय बदल होणार याकडे सर्व किक्रेट जगताचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment