
सॅन फ्रान्सिस्को, दि.4 – कॉम्प्यूटरच्या वापरामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या माऊस’चे जनक डगलस एंजेलबर्ट यांचे आज (गुरुवार) निधन झाले. मृत समयी त्यांचे वय 88 वर्ष एवढे होते.
सॅन फ्रान्सिस्को, दि.4 – कॉम्प्यूटरच्या वापरामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या माऊस’चे जनक डगलस एंजेलबर्ट यांचे आज (गुरुवार) निधन झाले. मृत समयी त्यांचे वय 88 वर्ष एवढे होते.
पोर्टलँड येथे 30 जानेवारी 1925 ला जन्मलेल्या डगलस यांनी ऑरेगॉन राज्य विद्यापीठातून विद्यूत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षणाचा जास्तीत जास्त वापर संशोधनासाठी केला. यामध्ये त्यांनी 1960 साली पहिला लाकडी कॉम्प्यूटर माऊस बनवला. तसेच त्यांनी कॅलिफोर्निया संशोधन संस्थेमध्ये ईमेल, वर्ड प्रोसेसिंग आणि व्हिडीओ टेलिकॉन्फरन्सींग आदी विषयांवरही महत्त्वपूर्ण काम केले होते.
दुसर्या महायुध्दा दरम्यान त्यांनी रडार तंत्रज्ञ म्हणून देखील काम पाहिले. तसेच अमेरीकेच्या नासा या संस्थेत विद्यूत अभियंता म्हणूनही काम पाहिले आहे. डगलस यांनी पहिल्यांदा व्हिडीयो कॉन्फरन्सिंग या संकल्पनेला सत्यात उतरवले. त्यांनी 48 किलोमिटर दूर असलेल्या आपल्या एका सहकार्यासोबत व्हिडीओ चॅटींगही केली.
यात विशेष म्हणजे, डगलस यांनी आपल्या शोधांचे कोणतेच पेटंट नोंदवले नाही. ज्याचा फायदा घेऊन अनेक कंपन्यांनी एसआरआयने माऊसचे पेटंट करुन घेतले. त्यानंतर अॅप्पलनेही याचे हक्क मिळवले.