सतीश तारे याना भावपूर्ण श्रद्धा’जली

पुणे, दि.3 (प्रतिनिधी) – जबरदस्त टायमिंगसेन्स आणि देहबोलीवर प्रभुत्व, नाट्यक्षेत्राच्या प्रत्येक बाजुची उत्तम जाण असलेला अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणज सतिश तारे त्याच्या अकाली निधनाने मराठी नाट्य – चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलु तारा निखळल्याचे भावना व्यक्त मान्यवरांनी त्यांना श्रधांजली अर्पण केली.

भास्करराव जाधव (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) – मराठी नाट्य-सिनेक्षेत्रातील कलावंत सतीश तारेयांचेनिधन झाले.सतीश तारेहेएक लोकप्रिय, हरहुन्नरी विनोदवीर कलावंत होते.आपल्या लवचिक विनोदी अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करून एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला होता.आपल्या कसदर अभिनयाने सर्वसामान्यांच्या धकाधकीच्या जीवनात चार आनंदाचे क्षण मुलवणारा अभिनेता आज आपल्यातून हरपला.

विजय कदम (अभिनेते) – ‘टूरटूर च्या प्रयोगात माझी सतीशशी ओळख झाली. त्यानंतर सतीशच्या सदाशिव पेठेतील जुन्या घरी आमची गप्पांची मैमल खूप रंगायची. त्याची शब्दांवर प्रचंड हुकुमत होती. ‘विच्छा माझी पुरा करा’ची या सिडीसाठी मी त्याच्यासोबत केलेली बतावणी म्हणजे माझ्यासाठी केवळ अविस्मरणीय ठेवाच आहे. त्याच्या अशा अचानक ए्गझीटमुळे धक्का बसला.

प्रभाकर भावे (रंगभूषाकार) – सतीश एक उमदा आणि अष्टपैलु कलाकार होता. विनोदाची उत्तम जाण आणि उत्तम टायमिंग हेच त्याच्या व्यक्तीमत्त्वातील वैशिष्ट्य होते. बालरंगभूमीपासून मी त्याला ओळखतो. त्याचा मेकअप मीच केला आहे. सतीश हा अभिनयासाठीच जणू जन्मला होता. त्याला संगीताचीही उत्तम जाण होती.

मेघराज राजेभोसले ( चित्रपट-नाट्य निर्माते) – हरहुन्नरी व मोकळ्या मनाचा कलाकार आपल्यामधून हरपला. आमच्या ‘जाऊ तिथं खाऊम या नाटकाचे त्याने दिग्दर्शन केले होते. या नाटकाच्या निमित्ताने त्याला जवळून ओळखता आले. 50 लोकांचा संच असलेले हे नाटक असूनही वातावरण एकदम हसत खेळत व शिस्तबद्धही होते. लहानातल्या लहान कलाकारापासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत सगळ्यांना सांभाळून घेण्याची त्याची क्षमता होती. विनोदात पुण्याचे नाव मोठे करण्याचे श्रेय सतीशला जाते.

चंद्रशेखर भंडारे (नाट्य निर्माते) – महाराष्ट्राला खळखळून हसविणारा विनोदी अभिनेते सगळ्यांना रडवून गेला. पुण्यातून चालणार्‍या त्यांच्या मोठ्या नाटकांपैकी ‘सौजन्याची एैशीतैशीम या नाटकातील त्यांची नाना बेरके ही भूमिका खूप गाजली. त्यातील त्यांचे ‘तरणा वांड, तरणा बांड. हा नाना म्हणजे महाराष्ट्राची आडवी उभी शानम हे वा्नय प्रचंड गाजले होते. अष्टपैलु अभिनेता हरवला.
मोहन कुलकर्णी (नाट्य व्यवस्थापक) – संगीत अभिनय, नृत्य, वाद्य अशा सगळ्याची माहिती असणारा, रक्तात अभिनय असलेला हा कलाकार होता. सतीश तारे म्हणजे लेखन, दिग्दर्शन याची जाण असणारा आणि उत्स्मुर्त अभिनय, योग्य वेळेत सादरीकरण यावर प्रभुत्व असणारा कलावंत होता. उत्तम विनोदी निवडक कलाकारांमध्ये सतीशचे नाव घेता येईल.
——————————

Leave a Comment