मारूती सुझुकीची लिमिटेड एडिशन स्विफ्ट

नवी दिल्ली दि.३ – देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारूती सुझुकी इंडियाने लिमिटेड एडिशन प्रिमिअर कॉम्पॅक्ट स्विफ्ट मंगळवारी लाँच केली आहे. पूर्वीच्या स्विफ्टपेक्षा या कारची किमत सुमारे २५ हजारांनी अधिक आहे. उत्पादनाच्या विक्रीवाढीसाठी हा उपाय कंपनीने योजला असल्याचे समजते. नवी लिमिटेड एडिशन स्विफ्ट आरएस व्हीएक्सआय व व्हीडीआय अशा व्हेरिएंटमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मॉडेलच्या किमती सध्या अनुक्रमे ४.९९ व ५.९९ लाख आहेत. लिमिटेड एडिशनसाठी त्यापेक्षा २५ हजार रूपये अधिक मोजावे लागणार आहेत.

याविषयी बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष मनोहर भट म्हणाले की कंपनीने सुरू केलेल्या सेलिब्रेशनचाच लिमिटेड एडिशन हा एक भाग आहे.२००५ च्या मे मध्ये स्विफट प्रथम लाँच केली गेली होती. त्यानंतर आत्तापर्यंत कंपनीने ९ लाख ६० हजार गाड्या विकल्या आहेत आणि याच वर्षात हा आकडा दहा हजारावर नेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यासाठी लिमिटेड एडिशन काढण्यात आली आहे. जुलैत थोड्या दिवसांसाठीच या गाडीची विक्री केली जाणार आहे.

Leave a Comment