नक्षलग्रस्त भागात आदिवासी भाषेतून रेडिओ

मुंबई दि.३ – महाराष्ट्र शासनाने नक्षलग्रस्त भागात राहणार्याि आदिवासी जातीजमातींपर्यंत पोहोचण्यासाठी गोंडी व अन्य आदिवासी स्थानिक बोलीभाषेतील रेडिओ चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

विदर्भातील कांही जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. या जिल्ह्यांच्या सीमा आंध्र आणि छत्तीसगड राज्यांना लागून आहेत. या भागात बोलली जाणारी भाषा मराठीपेक्षा खूपच वेगळी आहे. परिणामी या भागातील आदिवासींशी संवाद साधणे अथवा सरकारी विकास कामांच्या योजना अथवा अन्य सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचण्यात अनेक अडचणी येतात. तसेच या आदिवासींची नक्षल्यांच्या प्रभावातून सुटका होणे हे ही महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने या आदिवासींना समजेल अशा बोलीभाषेत व त्यातही गोंडी भाषेत रेडिओ चॅनल सुरू करण्याची योजना आखली गेली आहे.

याचबरोबर आदिवासींसाठी असलेल्या योजनांची माहिती देणारी पत्रके व पोस्टर्सही नक्षलग्रस्त भागात स्थनिक भाषेतून लावली जाणार आहेत. या संबंधी गोंडी भाषेतील तज्ञांशी सल्लामसलत सुरू आहे. अँटी नक्षल ऑरगनायझेशनचे उप पोलिस महासंचालक पी.के. जैन यांनी या बातमीला दुजोरा दिला असून या कामासाठी नागपूरमध्ये विशेष विभाग सुरू करण्यात येत असल्याचेही सांगितले.

Leave a Comment