कोकणात पावसाचा जोर कायम; रेल्वे सुरळीत

रत्नागिरी: गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण रेल्वेच्या आरवली स्टेशनवर रुळावर आलेली माती हटवण्यात आल्या वाहतूक पूर्ववत झाली आहे. त्यासोबतच आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकही हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

कोकणात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. कुडाळजवळ पिठढवळ नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. तुरळ गावाजवळही मुंबई – गोवा महामार्ग बंद आहे. कोकणात सोमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने मंगळवारीही विश्रांती घेतली नाही. कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सर्वात जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या तरुळजवळ नदीपात्राजवळच्या घरात पाणी घुसल्याने, लोक घराच्या छतावर अडकले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाल्याने चिपळूण आणि संगमेश्वरच्या दिशेने काही किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.

चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान अरवली स्थानकानजीक रेल्वेच्या ट्रकवर माती आली आहे. यामुळे कोकण रेल्वेला ही पावसामुळे ब्रेक लागला होता. कोकण रेल्वेच्या आरवली स्टेशनवर रुळावर आलेली माती हटवण्यात आल्या वाहतूक पूर्ववत झाली आहे. त्यासोबतच आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकही हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment