अभिनेते सतीश तारे यांचे निधन

मुंबई: मराठीतील प्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांचे बुधवारी निधन झाले. मुंबईतील जुहू परिसरातील सुजय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारीच त्याना डायबेटसचा त्रास होत असल्याने उपचारासाठी सुजय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पायावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे समजते.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या होत्या. ताकदीचा विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती. सध्या त्यांचे ‘गोडगोजिरी’ हे नाटक सुरु होतं. तर झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या चौथ्या मोसमाचे विनर होते.

गेल्या काही दिवसांपासून डायबेटिजमुळे त्रस्त असलेल्या तारे यांना मंगळवारीच रुग्णालयात दाखल करण्यात होता. मात्र बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पायावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असलयाचे समजते. त्यांतच्यात अकाली निधनाने मराठी सिनेस्रुष्टीत शोककळा पसरली आहे.

Leave a Comment