जळगाव – उत्तराखंडामधल्या मदतकार्यादरम्यान हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले जवान गणेश अहिरराव यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. जळगावच्या वडाळा-वडाळी या त्यांच्या मूळगावी त्यांचा बुधवारी शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आला. गणेश अहिरराव यांच्या चार वर्षाच्या मुलाने मुखाग्नी दिला.
शहीद गणेश अहिरराव अनंतात विलीन
शहीद गणेश अहिरराव यांचे पार्थिव काल महाराष्ट्रात आणण्यात आले. त्यानंतर चाळीसगावकरांना शहिदाचे दर्शन घेता यावे म्हणून रात्रभर पार्थिव गˆामीण रुग्णालयात ठेवण्यात आले होते.
गणेश अहिरराव हे एनडीआरएङ्गमध्ये जवान होते. त्यांना झालेल्या अपघातात त्यांच्यासह २० जवान शहीद झाले होते. मात्र गणेश यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. डीएनए प्रोङ्गायलिंग झाल्यानंतर मंगळवारी त्यांचे पार्थिव चाळीसगावमध्ये आणण्यात आले.