दार ए सलाम दि.३ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तचे राष्ट्रपती मोहम्मद मोर्शी यांच्याशी फोन वरून संवाद साधून देशातील राजनितिक संकट वाढत चालले असल्याने जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे असा सल्ला दिला असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यातवर असलेल्या ओबामा यांनी या दौर्या च्या अंतिम टप्प्यात टांझानिया येथून मोर्शी यांच्याबरोबर फोनवरून संवाद साधला असे समजते.
व्हाईट हाऊस कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ओबामा यांनी इजिप्तमधील लोकशाहीसाठी अमेरिका कटिबद्ध आहे व कोणत्याही खास पक्षाचे अथवा संघटनेचे समर्थन केले जाणार नाही असेही सुनावले आहे. लोकशाही निवडणुकांपेक्षाही अधिक महत्त्वाची आहे आणि लोकशाहीत जनतेचा आवाज प्रथम ऐकणे हे गृहित धरलेले असते असेही ओबामा यांनी बजावले. मोर्शी यांनी त्यांना लोकांची काळजी आहे आणि जनतेचे हित ते सांभाळतील असा विश्वास जनतेला वाटावा असे पाऊल उचलले पाहिजे असेही ओबामा म्हणाले व त्याचबरोबर सध्याच्या अडचणीतून राजनितिक प्रक्रियेतूनच मार्ग शोधला जाईल असेही मत व्यक्त केले आहे.