मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनीही खोलले फेसबुक अकौंट

मुंबई दि.२ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेसबुक या सोशल साईटच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधण्यास सिद्ध झाले असल्याचे समजते. गेल्याच आठवड्यात उत्तराखंडात सुरू असलेल्या सुटका अभियानाची माहिती घेण्यासाठी ते प्रथम फेसबुकवर लॉग इन झाले होते. त्यावर जनतेकडून काय प्रतिक्रिया आल्या याची माहिती घेतली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक अकौंटसाठी राज्याच्या आयटी विभागातील व मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्‍याचे पथक कार्यरत आहे. चव्हाण यांच्या अकौंटवर हे अधिकारी दररोज लक्ष ठेवतात तसेच अकौंटवर आलेल्या प्रतिक्रिया, कॉमेंट व सूचनांची माहितीही मुख्यमंत्र्यांना देतात असे समजते. जेव्हा शक्य असेल तेव्हा जनतेच्या प्रतिक्रियांना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने उत्तरेही दिली जातात. तसेच यात कांही महत्त्वाचा मुद्दा आढळला तर त्याची माहिती त्वरीत मुख्यमंत्र्यांना दिली जात आहे असेही समजते. मुख्यमंत्र्यांचे फेसबुक अकौंट ही तक्रार पेटी नाही तर राज्यातील व देशातील सर्वसामान्य नागरिकांशी संपर्कात राहण्याचे व संवाद साधण्याचे ते महत्त्वाचे माध्यम आहे असे या अधिकार्‍याचे म्हणणे आहे.

Leave a Comment