पोलिसगिरीचा येरवडा जेलमध्ये शो ?

पुणे दि.२ – येरवडा कारागृहात तुरूंगवास भोगत असलेल्या संजय दत्तचा पोलिसगिरी हा चित्रपट येरवडा कारागृहातील कैद्यांसह संजयलाही पाहायला मिळावा यासाठी या चित्रपटाचा निर्माता राहुल आगरवाल प्रयत्नशील असल्याचे समजते. हे घडले तर कैदी पोलिसाच्या भूमिकेत आणि चित्रपट पाहतोय तुरूंगात अशी अवस्था निर्माण होणार आहे.

पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या नियमानुसार महिन्यातून एकदा कैद्यांना चित्रपट पाहण्याची परवानगी दिली जाते. त्यानुसारच राहुल आगरवाल त्याचा संजयची मुख्य भूमिका असलेला -पोलिसगिरी- या जेलमध्ये दाखविण्यासाठी प्रयत्नशील आहे. संजयला तुरूंगात जावे लागणार हे निश्चित झाल्यानंतर हा चित्रपट रेंगाळू नये म्हणून संजयने जिवाचे रान करून या चित्रपटाचे शूटिग पूर्ण केले आहे त्यामुळे आता परतफेडीची माझी पाळी आहे असे राहुलचे म्हणणे आहे. त्याच्यासाठी मला कांहीतरी करायचे आहे असे राहुल सांगतो.

Leave a Comment