अंतराळवीरांसाठी संरक्षक शिल्ड तयार

लंडन दि.२ -स्टार ट्रेक या मालिकेतील कल्पनेनुसार त्या स्टाईलचे चुंबकीय स्पेश शील्ड अंतराळवीरांसाठी संशोधकांनी तयार केले आहे. यामुळे अंतराळात असताना अंतराळवीरांना सूर्याच्या हानीकारक रेडिएशनपासून बचाव करणे शक्य होणार आहे. वजनाला अतिशय हलके असे हे शील्ड ऑक्सफर्डशायर येथील रूदरफोर्ड अॅपलटन लॅबोरेटरीत तयार करण्यात आले आहे. नासाच्या मंगळ अथवा चंद्रांवरील मोहिमादरम्यान याचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यावर सतत कॉस्मिक किंवा अति उर्जा बाहेर टाकणारी वादळे होत असतात. पृथ्वीवर वर्षभरात येणार्यां सूर्याच्या रेडिएशनची जेवढी तीव्रता असते तेवढी तीव्रता या वादळामुळे एका क्षणात निर्माण होऊ शकते. यामुळे अशा वेळी अंतराळात असलेल्या अंतराळवीरांना हे रेडिएशन धोकादायक ठरते. कांहीवेळा त्यामुळे उलट्या होणे, डायरिया किवा कांही अवयव निकामी होणे अशी इजा होऊ शकते. यापासून संरक्षण मिळावे म्हणून संशोधक प्रयत्नशील होते. त्यातूनच हे शील्ड तयार केले गेले आहे.

पृथ्वीभोवतीही चुंबकीय आवरण असते व याचमुळे सूर्याची रेडिएशन अन्यत्र वळविली जातात. त्याच धर्तीवर अवकाश यान आणि अंतराळवीरांना झाकू शकेल असे मॅग्नेटोस्पिअर संशोधकांनी तयार केले आहे. यातील इलेक्ट्रिक चार्जमुळे सूर्याकडून होत असलेले रेडिएशन अन्यत्र वळविले जाते व परिणामी अंतराळवीरांना त्याचा धोका राहात नाही असा संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment