बीड: काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी वाद झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भाजपमधून बाहेर पडलेले धनंजय मुंडे लवकरच आमदारकीचा राजीनामा देण्या्ची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदेश येताच धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्यायचे समजते. धनंजय मुंडे सध्या विधानपरिषदेचे आमदार आहेत. ही आमदारकी त्यांना भाजपकडून मिळाली होती.
धनंजय मुंडे देणार आमदारकीचा राजीनामा
आगामी काळात विधानपरिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये राष्ट्रीवादीच्या् कोटयातून त्यांरना आमदारकी दिली जाण्याची शक्यता आहे्. त्यामुळे आता धनंजय मुंडे आगामी विधानपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून हिरवा कंदिल मिळाला आहे.
परळी येथील भाजपचे नगरसेवक घेवून बाहेर पडल्यानंतर गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर धनंजयने भाजपातून बाहेर पडून राष्ट्र वादीत प्रवेश् करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९ जानेवारी २०१२ रोजी परळीतील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचे वडील आणि गोपीनाथ मुंडेचे मोठे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.