वायफाय तंत्रज्ञानाने पहा भिंतीतून आरपार

सुपरमॅनची एकस रे व्हिजन आपल्याला नेहमीच भुरळ घालत आली आहे. बंद दरवाजा, भिंतींचे अडथळे सुपरमॅनला कधीच जाणवले नाहीत कारण तो भिंतीतून दरवाजातून आरपार पाहू शकतो. आता हेच सर्वसामान्य माणसालाही एका उपकरणाच्या सहाय्याने शक्य होणार आहे. अमेरिकेतील एमआयटी कॉम्प्युटर सायन्स व आर्टिफिशियल इंटेलिजन्स संस्थेत हे उपकरण तयार केले गेले आहे. एमआयटी इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग प्रोफेसर दिना कटाबी आणि त्यांचे विद्यार्थी फदेल अदिब यांनी हे उपकरण तयार केले आहे.

कटाबी या विषयी माहिती देताना म्हणाल्या की पूर्वीही भिंतीच्या आरपार पाहू शकणारे उपकरण तयार केले गेले होते मात्र त्यासाठी महागड्या रडार टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रो मॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा वापर केला गेला होता. हा स्पेक्ट्रम लष्करासाठी उपलब्ध करून दिला जातो. नवीन उपकरणात वायफाय टेक्नॉलोजीचा वापर केला असल्याने हे उपकरण स्वस्तात बनले आहे. शिवाय ते सहज बाळगण्याजोगे, कुठेही नेता येणारे, कमी उर्जेवर चालणारे आणि कुणीही सहजतेने वापरू शकेल असे आहे.

वाय व्हाय असे याचे नाव असून त्यात दोन ट्रान्समिशन अॅंटेना, १ रिसिव्हर वापरला गेला आहे. रडार आणि सोनर इमेजिगप्रमाणेच यातही प्रतिमा ट्रॅक केल्या जातात आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणूस बंद दरवाजा अथवा भिंतीपलिकडे काय आहे ते पाहू शकतो.

Leave a Comment