मराठवाड्यात पावसाने ओलांडली सरासरी

औरंगाबाद – गेल्या् काही दिवसांपासून दुष्काळाचे चटके सहन केलेल्या मराठवाड्यावर यंदा पावसाची मेहरबानी झालेली दिसते. यावर्षी सुरूवातीपासूनच दमदार पावसाने हजेरील लावल्याने आगामी काळात चांगला पाउस बरसेल या आशेवर बळीराजाने पेरणी पुर्ण केली आहे. जून महिन्यात मराठवाडा विभागात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात सरासरीच्या निम्माच पाऊस पडला होता.

गेल्या काही वर्षात मराठवाडयात सरासरीपेक्षा कमी पाउस कोसळत होता. तसे पाहिले तर मराठवाड्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७७९ मिली मीटर आहे . त्यापैकी जून महिन्यात १४५. ८६ मिली मीटर पाऊस अपेक्षित आहे . यंदा जून महिन्यात विभागात आतापर्यंत १६२. ६६ मिली मीटर पाऊस पडला आहे . अपेक्षित सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण १११ .५५ टक्के आणि वार्षिक सरासरीच्या तुलनेत २० ९४ टक्के आहे . गेल्या वर्षी मराठवाड्यात जूनमध्ये विभागात केवळ ७१ . ४९ मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद होती . त्या तुलनेत यंदा विभागातील पावसाची स्थिती चांगली आहे .

गेल्या वर्षच्या तुलनेत मराठवाडयात यंदा सरासरी जास्त पाउस पडला आहे. विभागातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, बीड या जिल्ह्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यांत १५ टक्क्यांपेक्षा जास्त, उस्मानाबाद जिल्ह्यात दहा टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जून महिन्याची सरासरी लातूर व उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांनी ओलांडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जूनच्या सरासरीच्या तुलनेत ६६ .१३ टक्के आणि लातूर जिल्ह्यात ९०.०८ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे.

Leave a Comment