भारतीय क्रिकेट रसिकांना मेजवानी

लंडन दि.१ – भारतातील क्रिकेट प्रेमींसाठी खास खूषखबर आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत भारताला वर्ल्ड टेस्ट चॅपियन, तसेच वर्ल्ड २०-२० स्पर्धा पहिल्यांदाच भरविण्याची तसेच ५० षटकांचा वर्ल्ड कप स्पर्धा चौथ्यांदा भरविण्याची परवानगी मिळाली आहे. आयसीसीने २०१५ ते २०२३ या काळातील स्पर्धांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला असून त्यात भारताला या तीन स्पर्धा भरविण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमानुसार भारताला वर्ल्ड २०-२० स्पर्धा २०१६ सालात भरविता येणार आहे तर २०२१ सालात वर्ल्ड टेस्ट चॅपियन स्पर्धा भरविता येणार आहे. या दोन्ही स्पर्धा भारतात प्रथमच खेळविल्या जातील. २०२३ सालात भारत वर्ल्ड कप स्पर्धा चौथ्यांदा भरवू शकणार आहे. आयसीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड रिचर्डसन म्हणाले की आयसीसी इंग्लंड वेल्स किकेट बोर्डातर्फ नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी चॅपिंयन ट्रोफी स्पर्धा खूपच लोकप्रिय ठरल्या असल्याने यापुढे दर चार वर्षांनी याच स्पर्धा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅपियनशीप या नावाने भरविल्या जाणार आहेत.

Leave a Comment