टीम इंडियावर केली विंडीजने मात

जमैका: नुकतीच चॅम्पियन्स ठरलेल्या टीम इंडियाला वेस्ट इंडीजमधल्या तिरंगी मालिकेत सलामीलाच पराभवाचा धक्का बसला. यजमान वेस्ट इंडीजने भारतावर एक विकेट राखून मात १४ चेंडू बाकी असताना मालिकेतला आपला सलग दुसरा विजय साजरा केला. भारताने विजयासाठी २३० धावांचे आव्हान उभे केले होते.

विंडीजने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. भारताने ५० षटकात ७ बाद २२९ धावा केल्या. रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दिनेश कार्तिक बाद झाला. भारताचे दोन फलंदाज लवकर बाद झाल्या्नंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने संघाचा डाव सावरला. भारताचा दुसरा फलंदाज ३९ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. विंडीजच्यार गोलंदाजांनी टिच्चूान गोलंदाजी केल्यामुळे दोघांना वेगाने धावा काढता आल्या नाही.

या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ५० षटकांत ७ बाद २२९ धावांत रोखले. मग जॉन्सन चार्ल्सने ९७ धावांची खेळी करत वेस्ट इंडीजच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. डॅरेन ब्राव्होनेही ५५ धावा केल्या. भारताच्या उमेश यादवने तीन तर ईशांत आणि अश्विनने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. त्याआधी भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावा केल्या.

वेस्ट इंडिजने तिरंगी मालिकेत एक गडी राखून भारतीय संघावर विजय मिळवला. भारताने विजयासाठी २३० धावांचे दिलेले आव्हान इंडिजने ४७ षटकात पूर्ण केले. इंडिजने १४ चेंडू बाकी असताना ४७ षटकांमध्ये ९ गडी बाद केले.

Leave a Comment