इंटरनेटवर घटस्फोट देणार्‍यांची संख्या वाढती

लंडन दि.१ – लंडन मध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार घटस्फोट घेण्यासाठी किवा विभक्त होण्यासाठी ऑनलाईन सर्विसेस चा वापर करणार्‍या जोडप्यांची संख्या दिवसे न दिवस वाढत चालली असल्याचे दिसून आले आहे.२०१३ या वर्षात या सेवांचा वापर करून २५ हजार घटस्फोट झाले असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे. गत वर्षीच्या तुलनेत या प्रकाराने विभक्त होणार्‍यांचे प्रमाण २६ टक्कयांनी वाढले आहे.

एप्रिलमध्येच करण्यात आलेल्या कायद्यातील बदलामुळे ऑन लाईन सर्व्हीसचा वापर करून घटस्फोट घेणे हा स्वस्त व सोपा पर्याय म्हणून पुढे आला आहे. अर्थात या मार्गाने घटस्फोट घेणार्‍यांत पुरूषांचे प्रमाण एकूण संख्येच्या २/३ इतके आहे. या सर्वेक्षण संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार पुढील वर्षात जानेवारीपर्यंतच असा घटस्फोट घेणार्‍यांचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढेल आणि जोडपी संस्थेची मदत न घेता स्वतंत्ररित्याच हे काम करतील असा अंदाज वर्तविला गेला आहे. यूके मध्ये घटस्फोटासाठी येत असलेल्या अर्जात महिलांचे प्रमाण ६५ टक्के इतके आहे असेही समजते.

Leave a Comment