भारतीय तरुणांनी गेल्या पंचवीस वर्षात अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात जी भरीव भर टाकली आहे, त्याचा सन्मान व गेल्या शंभर वर्षात भारतीयांनी अमेरिकेला जे सांस्कृतिक आदान प्रदान केले आहे, त्याचा सन्मान म्हणून कॅलिफोर्निया राज्यांने ‘ऑक्टोबर महिना’ हा हिंदू महिना म्हणून पाळण्यो ठरविले आहे. या कामात कॅलिफोर्निया राज्यातील सिनेटर एलन कोर्बेट या महिलेने पुढाकार घेवून हिंदू अमेरिकन फौंडेशन यांच्या सहकार्याने ही मोहीम आखली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून भारतातील काही संघटनांनी ऑक्टोबर महिनाच ‘कॅलिफोर्निया मंथ’ म्हणून साजरा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील ‘सिलिकॉन व्हॅली’ हा शब्द भारतीयांच्या परिचयाचा आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर आयटी कंपन्या आहेत. त्यात सर्वात मोठी सं‘या भारतीय तरुणांची आहे. तेथील निम्मा अधिक उद्योग भारतीय तरुणच बघतात येवढेच नाही तर तेथील व्यवसायाला भारतीय तरुणांनी एक मोठी उंची आणून दिली आहे. याबाबत बोलताना सिनेटर एलिन कोर्बेट म्हणाल्या की, ‘आम्ही अमेरिकनांना ‘हिंदू’ शब्दाचा अर्थ सांगणारी पहिली व्यक्ती स्वामी विवेकानंद होती. 120 वर्षापूर्वी त्यांची या भूमीवर उमटलेली पावले अजूनही गदडच आहेत. कॅलिफोर्निया राज्यात त्यांनी सुरु केलेले अनेक उपक्रम आहेत. आज येथे पन्नास हिंदू मंदिरे आहेत. कॅलिफोर्नियापुरता विचार केला तर विज्ञान , तंत्रज्ञान, व्यापार आणि साहित्य या क्षेत्रात भारतीयांनी केलेली सेवा आज ‘अमेरिकामय ’ झाली आहे. हा महिना जरी येथे कॅलिफोर्निया राज्यात होत असला तरी सार्या अमेरिकेतील अनेक संघटना त्याला पाठिंबा तर देत आहेतच पण त्यात सक‘ीय सहभागीही होत आहेत.
कॅलिफोर्निया हा महिना साजरा करत असताना तेथील ‘पॉ’ या संघटनेने अमेरिकेतील साठ हजार लोकांची माहिती घेतली आहे त्याच्या आधारे अमेरिकन माणूसच हळूहळू जीवनशैलीला जवळ जात आहेत. असा निष्कर्ष काढला आहे. त्यांचे म्हणणे असे की, 1992 नंतर भारतीयांचा अनेरिकेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला भारतियांचाही अमेरिकेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. या काळातील अमेरिकेतील ख्रिश्चनांची सं‘या 68 टक्क्यावरून 61 टक्क्यावर आली आहे. या काळात मुस्लिमासह अनेक अल्पंसंख्य धर्मीय येथे आले त्यामुळे त्यांची सं‘या 19 टक्क्यावरून 25 टक्क्यावर गेला आहे. 1990पूर्वी येथे दरवर्षी स्थायिक होणार्या हिंदूंची सं‘या तीस हजार असायची ती आता वर्षाला सत्तर हजारावर पोहोचली आहे. दोन वर्षापूर्वी अमेरिकेतील हिंदूची संख्या या अठरा लाख होती. त्यात भारत, नेपाळ व भूतान या देशांचा संबंध अधिक आहे.
‘पॉ’ ही संघटना अमेरिकेत सामाजिक, धार्मिक व अल्पसं‘य विषयक प्रश्नांचा कायम आढावा घेत असते. पाच वर्षापूर्वी या संघटनेने केलेल्या एका पाहणीत ‘सहिष्णुता’हे हिंदूंचे वैशिष्ठ्य आहे व तो स्वभाव आता अमेरिकन लोक स्वीकारत आहेत. त्यांनी केलेल्या अमेरिकेतील लोकांच्या पाहणीच्या आधारे न्यूयॉर्कटाईम्सच्या न्यूज वीक या साप्ताहिकाच्या संपादिका श्रीमती लिशा मिलर यांनी ‘ काढलेल्या एका विशेषांकांचा मथळाच ‘अमेरिका हिंदू होते आहे का ?’ असा दिला होता. या महोत्सवाचा प्रतिसाद दररोज वाढतो आहे.