अँथलेटिक्स असोसिएशनच्या निवडणूकीत कलमाडी पराभूत

नवी दिल्ली – खासदार सुरेश कलमाडीं यांना राष्ट्रकूल स्पर्धेतील घोटाळा प्रकरण चांगलेच भोवले आहे. त्यामुळेच सोमवारी एशियन अँथलेटिक्स असोसिएशनच्या (एएए) निवडणूकीत सुरेश कलमाडी यांचा पराभव झाला आहे. यापूर्वी ते १३ वर्षां अध्यएक्ष म्हुणून काम पाहत होते. कलमाडी यांचा कतारच्या दहलान अल-हमाद यांनी दोन मतांनी पराभव केला. निवडणूकीत हमाद यांना २० तर कलमाडी यांना १८ मते पडली आहेत.

सोमवारी आशियाई ऍथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदासाठी महासंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये निवडणूक झाली. हमाद यांच्या या विजयामुळे विद्यमान अध्यक्ष कलमाडी यांची १३ वर्षांची कारकीर्द संपुष्टात आली आहे.

काही दिवसापुर्वि झालेल्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कलमाडींना तुरुंगवास झाला होता. सध्या त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. एएएच्या अध्यक्षपदासाठी कलमाडी पुन्हा उत्सुक होते. दरम्यान, हमाद हे एशियन अँथलेटिक्स असोसिएशनचे वरिष्ट उपाध्यक्ष पदावर यापूवी कार्यरत आहेत.