पुणे, दि. 30 (प्रतिनिधी) – सात दिवसांत शिक्षण खात्यातील आठपैकी सहा शिक्षण संचालक सर्व रिक्त पदांवर नेमणुका होतील, असे विधान शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले होते. मात्र, अद्याप काहीच हालचाली सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षण खात्याचा कारभार ‘प्रभारीमवर सुरू असून, या शिक्षण संचालकांच्या नियुक्त्या कधी होतील? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सहा शिक्षण संचालकांची पदे आश्वासनानंतरही रिक्त
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक‘म संशोधन मंडळ (बालभारती), बालचित्रवाणी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), राज्य परीक्षा परिषद, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, अल्पसं‘याक आणि प्रौढ शिक्षण संचालक ही एकूण आठ पदे आहेत. यापैकी राज्य शिक्षण मंडळ आणि शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेवर अनुक‘मे सर्जेराव जाधव आणि एन. के. जरग यांच्या नियमित नेमणुका झाल्या आहेत. उर्वरित पदे अजूनही र्नित आहेत.
माध्यमिक विभागाचे सहसंचालक गंगाधर म्हमाणे यांच्याकडे बालभारती आणि अल्पसं‘याक आणि प्रौढ विभागाचा अतिर्नित कार्यभार सोपविण्यात आला आहे. ‘एससीईआरटीमचे संचालक एन. के. जरग यांच्याकडे बालचित्रवाणीचा अतिर्नित कार्यभार आहे. सर्जेराव जाधव यांच्याकडे माध्यमिक विभागाची अतिर्नित जबाबदारी आहे; तर महावीर माने यांना राज्य परीक्षा परिषद आणि प्राथमिक शिक्षण संचालकपदाचे काम पाहावे लागत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याची अवस्था बिकट असल्याचे दिसून येत आहे.
एका कार्यक‘मासाठी मागील आठवड्यात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सात दिवसांत सर्व पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिक्षण खात्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अजूनही शिक्षण संचालकांच्या नेमणुका झाल्या नाहीत. शिक्षण खात्याचा कारभार ‘प्रभारीमवर सुरू असल्याने यंदा बालभारतीकडून मोठ्या प्रमाणात चुका झाल्या आहेत. प्राथमिक व माध्यमिक विभागाचा कामकाज संथगतीने सुरू आहे. शिक्षण खात्याकडून योग्य निर्णय घेण्यात येत असले तरी, शिक्षण संचालकांअभावी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संचालकपदांच्या नियु्नत्यांना केव्हा मुहूर्त मिळेल, अशी चर्चा शिक्षणक्षेत्रात होत आहे.
