वेस्टी इंडिजची श्रीलंकेवर मात

जमैका- तिरंगी मालिकेतील पहिला सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा सहा विकेट्सने पराभव केला. या विजयासह विंडीजने बोनस गुण वसूल केला आहे. विंडीजचा सलामीवीर ख्रिस गेलने ७ षटकार आणि ९ चौकारांसह दमदार शतक ठोकून श्रीलंकेच्या गोलंदाजाची धुलाई केली. गेलने आक्रमक फलंदाजी करताना १० चेंडुंमध्ये १०९ धावांची स्फोटक खेळी केली.

शुक्रवारी जमैका येथे झालेल्या‍ तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्टा इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परत एकदा श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. माहेला जयवर्धेने आणि उपुल थरंगा या जोडीने ६५ धावांची दमदार सलामी दिली. त्या नंतर ठराविक अंतराने श्रीलंकेचे फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ ४८.३ षटकांमध्ये २०८ धावांमध्ये गारद झाला. सुनील नारायणने ४ तर रवि रामपॉलने ३ बळी घेतले. माहेला जयवर्धेनेने ५२ तर कर्णधार एंजेलो मॅथ्युनजने नाबाद ५५ धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिजचे सलामीवीर ख्रिस गेल आणि जॉन्सन चार्ल्सा या जोडीने आक्रमक सुरुवात करताना ११५ धावांची सलामी दिली. गेलने ७ षटकार आणि ९ चौकारांसह झंझावाती शतकी खेळी केली. तो बाद झाल्याकनंतर मार्लन सॅम्युअल्स आणि ड्वेन ब्राव्हो्ने विजयी लक्ष्य‍ गाठले. त्या‍मुळे वेस्टइंडिजने या सामन्यात बोनस गुणाचीही कमाई केली. आता तिरंगी मालिकेत रविवारी टीम इंडियाचा सामना होणार आहे:

Leave a Comment