नव्या दोस्तांची नवी कहाणी

करण जोहर आणि आमिर खान हे खर तर हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि मुरलेले दिग्दर्शक आहेत. तसे ते एकमेकांच्या विरोधात देखील कधी नाही आणि त्याच्या जवळकीचे किस्से देखील फार ऐकिवात नाही. पण नुकताच झालेला हा किस्सा दोघांच्या ही चांगलाच स्मरणात राहणारा आहे.

करण जोहोर हिस्ट्री टीव्ही १८ या वाहिनीवरील “बॉलीवूड @ १००” या एका शोचे होस्टिंग करत आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याने नुकताच आमिरची एक खास मुलाखत घेतली. ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झालेल्या लगान या चित्रपटाबद्दल खूप गप्पा मारल्या.केजोच्या विनंतीला मान देऊन आमिर या कार्यक्रमास आवर्जून आल्याने या शो ला चारचांद लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही. मि. परफेक्शनिस्टच्या एपिसोडमध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये केजोने हा एपिसोड स्वतः दिग्दर्शित केला आहे. येत्या रविवारी या हा शो प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आमिरच्या चाहत्यांना त्याच्याविषयी आणखी बऱ्याच गोष्टी कळणार आहेत.

Leave a Comment