जीप चे पहिले मॉडेल २०१३ अखेरी भारतात

पुणे दि.२९ – इटलीच्या फियाट ग्रूपने अमेरिकन कार मेकर जीपशी केलेल्या भागीदारीतून तयार होणारे पहिले मॉडेल भारतात २०१३ सालच्या अखेरी जीप याच ब्रँड नेमने सादर केले जाणार असल्याचे फियाट ग्रुप ऑटो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष नागेश बसवनहळ्ळी यांनी सांगितले. ते म्हणाले की आम्ही जीप ब्रँडनेमखाली पहिले मॉडेल सादर करण्यास अतिशय उत्सुक आहोत.

नागेश बसवनहळ्ळी पुढे म्हणाले की आमची तीन मुख्य उद्दिष्टे आहेत. आमच्या फ्रायडे उत्पादनांबाबत आम्हाला अतिशय अभिमान आहे तसेच लिनिया पेट्रोल इंजिन आणि जीप ची कार वेळेत सादर करणे. देशात सध्या आमच्या वितरकांची संख्या ६३ आहे पण ती लवकरच १०० वर नेली जाणार आहे. येत्या तीन वर्षात कंपनी फियाटची चार नवीन मॉडेल्स तसेच जीपची चार मॉडेल्स सादर करणार आहे. त्यात जीप उत्पादनांत कॉम्पॅक्ट एसयूव्ही, प्रिमियम एसयूव्ही मॉडेल्सचा समावेश आहे. ही मॉडेल्स २०१६ च्या सुमारास बाजारात आणली जाणार आहेत.

सध्या जीप मॉडेल पूर्णपणे उत्तर अमेरिकेतून आयात केली जाणार आहेत मात्र नंतर स्थनिक पातळीवर उत्पादनाचा विचार केला जाणार आहे. फियाटचा पुण्याजवळ उत्पादन प्रकल्प असून त्यात वर्षाला १ लाख ६० हजार गाड्या व तीन लाख इंजिन्स तयार केली जातात.

Leave a Comment