एसटीची पुन्हा सोमवारपासून दरवाढ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या डिझेल दरवाढीचा फटका एसटीला बसला असून त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचा (एसटी) प्रवास लवकरच सात टक्क्यांनी महागणार आहे. त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून म्‍हणजचे रविवारी मध्यरात्री नंतर होणार आहे. या दरवाढीमुळे मात्र बसने प्रवास करणा-या सवेसामान्य नागरिकांचे मात्र हाल होणार आहेत.

या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्‍या प्रमुख पदाधिका-याची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये बारा टक्क़यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारने कमी दरवाढीला हिरवा कंदील दर्शविला आहे.

त्यामुळे आता एसटी प्रवास सात टक्क्यांनी महागणार असून याची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून होईल. नवीन दरवाढीनुसार प्रत्येक टप्प्यावर प्रवाशांना ३५ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. यापूर्वी २७ सप्टेंबर २०१२ रोजी एसटीच्या तिकिटात प्रत्येक टप्प्याला ३० पैशांनी भाववाढ झाली होती. त्यानंतर लगेचच पुन्हा दहा महिन्यांनी भाववाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एसटीने कर्मचा-यांना पगारवाढ केली आहे. त्याचा अर्थिक ताणही कमी होणार आहे.

Leave a Comment