55 लाखांचा गैरव्यवहार; पुणे चित्रपट कृती समितीचा आरोप

पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 55 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत पुणे चित्रपट कृती समितीच्या वतीने धर्मादाय आयुक्तालयात दावा दाखल करण्यात आला आहे. महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाला धर्मादाय आयुक्तांनी नोटीस बजावली असून 22 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिली आहेत, अशी माहिती कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इंम्पाचे संचालक विकास पाटील, महामंडळाचे संचालक संजय ठुबे, चित्रपट अनुदान समितीचे सदस्य मेघराज राजेभोसले, दिग्दर्शक मिलिंद लेले, अर्जुन नलावडे, सुरेंद्र पन्हाळकर, मधुकर पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मराठी चित्रपट व्यवसायाची जन्मभूमी आणि आज मराठी चित्रपटांच्या व्यवसायाचे प्रमुख केंद्र बनलेल्या पुण्यावर महामंडळाकडून अन्याय होत असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.

चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त महामंडळाच्या वतीने पुण्यात मानाचा मुजरा कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक‘माला महामंडळाच्या बैठकीत 5 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी होती. मात्र, अध्यक्षांनी यासाठी 55 लाख रुपये खर्च केले आणि त्यासाठी महामंडळाचे मिक्स डिपॉझिट वापरण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. दरम्यान, मानाचा मुजरा कार्यक‘मात कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचे महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सांगितले.
महामंडळाचे मु‘य कार्यालय कोल्हापूर येथे आहे, याशिवाय मुंबई व पुणे येथे महामंडळाचे कार्यालय आहे. परंतु, 1 डिसेंबर 2012 पासून महामंडळाचे पुण्यातील कार्यालय बंद करण्यात आले आहे. कार्यालय लवकरच सुरू करण्यात येईल, असे महामंडळाच्या अध्यक्षानी सांगून देखील सहा महिने उलटून गेले तरी ते कार्यालय बंदच आहे. हे कार्यालय बंद असल्याकारणाने नवीन कालाकार, निर्माते तंत्रज्ञ, यांची सदस्यत्व नोंदणी रखडली आहे. शिवाय पुण्यातील शेकडो सदस्यांची कामेही खोळंबली आहेत. याचा निषेध म्हणून चित्रपट व्यावसायिक उद्या (रविवार) बालगंधर्व रंगमंदिर ते शनिवार वाडा निषेध मोर्चा काढणार आहेत.
——————————

Leave a Comment