
लंडन दि.२८ – ब्रिटनचे युवराज आणि डचेस केट मिडलटन यांचे बाळ म्हणजे राज्याच्या गादीचा भावी वारस जुलैच्या दुसर्या पंधरवड्यात जन्माला येणार असला तरी तो नक्की कधी जन्मणार, दिलेल्या तारखेच्या अगोदरच तो जन्माला येणार का यावरून ब्रिटनमधील बुकींनी बेटींग घेण्यास सुरवात केली असून आत्ताच हा आकडा ५० हजार पौंडावर गेला आहे. मात्र बाळाच्या जन्माची तारीख जशी जवळ येत जाईल त्यानुसार अधिकाधिक लोक बेटींग करतील आणि हा सट्टा तीन लाख पौंडांच्या घरात जाईल असे सांगितले जात आहे.
