
नवी दिल्ली, दि. 28 – रुपयामध्ये सतत होणार्या घसरणीचा परिणाम आता सामान्यांच्या खिशावर पडणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाचे सतत होणारे अवमुल्यनामुळे आज (शुक्रवार) मध्य रात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत 1.82 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पेट्रोलसोबतच डिझेलच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच महिन्याच्या 16 तारखेला पेट्रोलचे दर वाढवण्यात आले होते. ही दरवाढ म्हणजे पेट्रोलच्या किंमतीतील या महिन्यातील दुसरी वाढ आहे. सर्व बाबतीत महागाईची झळ सोसणार्या सामान्य जनतेला पेट्रोलच्या दरवाढीने जबर फटका बसणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची मागील काही दिवसांपासून होत असलेल्या घसरणीमुळे तेल कंपन्यांनाही मोठा तोटा होत आहे. याच तोट्यापासून वाचण्याकरीता तेल कंपन्यांनी शुक्रवार रात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत 1.82 रु. प्रतिलिटर एवढी वाढ केली आहे. या दरवाढी बरोबरच मुंबईत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत 76.42 एवढी होणार आहे.
