दया आपल्या टीमसह उत्तराखंडमध्ये

कलाकार दयानंद शेट्टी पूरग्रस्त राज्यामध्ये पीडितांना व सैन्याला मदत करण्यासाठी आपल्या शोच्या टीमसह उत्तराखंडला पोहोचला. टीव्ही शो सीआयडीची शूटिंग अलीकडेच हरिद्वार व ऋषिकेशमध्ये झाल्याने शोच्या कलाकारांचा पूरग्रस्त राज्याशी आपुलकी निर्माण झाली होती. म्हणूनच सीआयडी टीम पीडितांना मदत करण्याकरिता वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करत आहे.

सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर दयाची भूमिका साकारणारे दयानंद शेट्टी उत्तरेकडील राज्याकडे रवाना झाले आहेत. सीआयडीमधील इन्स्पेक्टर दयाची भूमिका करणारे दयानंद शेट्टी म्हणाले, आम्ही राज्याच्या भयावह कहाण्या ऐकत असून ते असहाय्य असल्याची जाणीव होत आहे. मी आपल्या शोचे निर्माता बीपी सिंग व सहाय्यक दिग्दर्शकांसह उत्तराखंडला जात असून तेथे पोहोचून मी लोकांची मदत करेन. आम्ही ऋषिकेशला जाणार आहोत आणि त्यानंतर जोशीमठ येथे जाणार आहोत. तेथे आम्ही लोकांकरिता जेवणाची व्यवस्था करु. महत्त्वाचे म्हणजे जोशीमठमध्ये सर्वात
जास्त लोक अडकलेले आहेत. या टीमचा कोणत्याही एनजीओ किंवा राजनैतिक दलाशी संबंध नाही. टीमची योजना लोकांना घरी पोहोचण्यामध्ये मदत करण्याची आणि त्यांना औषधे व पांघरुण वाटपाची आहे. मी सैन्याला शारीरिकदृष्ट्या मदत करण्यासाठी तयार आहे. टीम स्थानिक लोकांबरोबर संपर्कात आहे, दयाला सध्या आपल्या कामाची जराही चिंता नाही. ते म्हणतात, ‘‘शो माझ्याशिवायही सुरु राहील. मी उत्तराखंडमध्ये 10-20 दिवस राहणार आहे. तसेच आवश्यक असेल तर त्यापेक्षा जास्त दिवस राहण्याकरिताही मी तयार आहे.

Leave a Comment