
कच्छ,, दि.28 – पाकिस्तानच्या 12 मच्छीमारांना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गुजरात मधील कोटेश्वर येथून अटक केली आहे. भारतीय सागरी हद्दीत अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याबद्दल त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची अधिक चौकशी सुरु आहे. पाकिस्तानच्या मच्छीमारांनी महिन्यामध्ये दुसर्यांदा सागरी सीमेचे
उल्लंघन केले आहे. 12 जून रोजी गुजरात मधील जखाऊ समुद्र किनारपट्टीपासून 38 सागरी मैल अंतरावर आंतरराष्ट्रीय नौदल सीमा रेषेजवळ पाकिस्तानच्या
मच्छिमारांना अटक करून 38 बोटी ही तटरक्षक सीमा सुरक्षा दलाने जप्त केल्या होत्या.
