युपीएने डॉलर 45 वरून 61 वर नेला : खा. प्रकाश जावडेकर

पुणे,दि.28: राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए)संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे युपीएने सत्ता घेतली तेंव्हा रुपयाचा डॉलरशी विनियम हा पंचेचाळीस रुपये होता तो आता डॉलरला एकसष्ट रुपये झाला आहे.एक अर्थतज्ञ शास्त्रज्ञ पंतप्रधान असतानाही ही स्थिती आहेे. देशाचे दिवाळे निघाले आहे. या सरकारने कालच वायुइंधनाच्या किमती दुप्पट केल्या आहेत. त्यामुळै सामान्य माणसाला जगणे अजून अशक्य होऊन बसणार आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय प्रवक्ते खा. प्रकाश जावडेकर यानी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

2004 साली संयुक्त पुरोगामी अ्राघाडीने सत्ता घेतली तेंव्हा अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असल्याची कबुली त्या सरकारनेही दिली होती असे सांगताना ते म्हणाले, त्या त्या वेळेला वित्तिय तूट भरून काढण्यासाठी जर उपाय योजले असते तर ही अवस्था आली नसती. जी उपाय शक्य होते तेही या सरकारने केले नाहीत. निर्यातीला वाव देणे व आयात कमी करणे हे त्यावरील उपाय जगजाहीर आहेत. ते गेल्या नऊ वर्षात झाले नाहीत. त्याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. मर्यादित प्राप्ती असणार्‍या सामान्य जनतेेचे जिणे अशक्य होऊन बसले आहे.

हवामान खात्याने मुसळधार पावसाची पूर्वसूचना उत्तराखंड राज्याला दि.10 जूनरोजी दिली होती अशा स्थितीत जर त्या सरकारने हृषिकेष, डेहराडून व हरिद्वारयेथून जर यात्रेकरूना चारीधाम यात्रेसाठी न जाण्याचा निर्देश केला असता तर काही हजार यात्रेकरूवर जी दुर्दैवाची कुर्‍हाड कोसळली ती कोसळली नसती. अजूनही तीन हजार यात्रेकरूंचा पत्ता लागलेला नाही. या दुर्दैवाला राज्य सरकारच जबाबदार आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले.
या सार्‍या दुर्घटनेत रस्ते वाहून गेले ही सर्वात मोठी समस्या आहे. हे सारे रस्ते केद्रीय सीमा महामागर्ं संघटनेकडेच्या ताब्यातील आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी सेना विभागाकडून रस्त्यांच्या गंभीर स्थितीची कल्पना देण्यात आली होती व 2010 साली सातशे रुपयांची मागणी केली होती तेथे फक्त पन्नास कोटी दिले गेले. अकरासाली चारशे कोटी मागितले होते तेथे शंभर कोटी मान्य केले व प्रत्यक्षात पन्नास कोटी दिले. आणि बारासाली चारशे कोटी मागितले असताना फक्त पंचवीस कोटी दिले. हा रस्ता सीमेवर जाण्यासाठीही महत्वाचा आहे. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ते वाहून जाण्याची घटना घडली आहे.

भाजपाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या लोकसभा निवडणुकीला आठ कोटी रुपये खर्च आला असे सांगितले आहे, ती मर्यादा निवडणूक आयोगाच्या मर्यादेत बसते का, असे विचारता ते म्हणले,श्री मुंडे यांनी एका गंभीर प्रश्नाला चालना दिली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत त्या त्या उमेद्वाराचा जसा खर्च होतो त्या प्रमाणे पक्षाचाही मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.पक्षाला खर्चाची मर्यादा नाही. त्यामुळे कोणी कायद्याने आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही. पण श्री मुंडे यांनी यातून निवडणुकीत जो काळा पैसा येतो त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते याकडे लक्ष वेधले आहे. अनेक जण प्रत्यक्षात अतिप्रचंड खर्च करत असतात. या समस्या सार्‍यांनी मिळून सोडविली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.