भावी वारसाच्या जन्मतारखेवर ३ लाख पौंडांचा सट्टा

लंडन दि.२८ – ब्रिटनचे युवराज आणि डचेस केट मिडलटन यांचे बाळ म्हणजे राज्याच्या गादीचा भावी वारस जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात जन्माला येणार असला तरी तो नक्की कधी जन्मणार, दिलेल्या तारखेच्या अगोदरच तो जन्माला येणार का यावरून ब्रिटनमधील बुकींनी बेटींग घेण्यास सुरवात केली असून आत्ताच हा आकडा ५० हजार पौंडावर गेला आहे. मात्र बाळाच्या जन्माची तारीख जशी जवळ येत जाईल त्यानुसार अधिकाधिक लोक बेटींग करतील आणि हा सट्टा तीन लाख पौंडांच्या घरात जाईल असे सांगितले जात आहे.

युवराज विल्यम्सची आई डायना हिने विल्यम्सच्या जन्माच्या वेळी मुद्दाम खोटी तारीख दिली होती व दिलेल्या तारखेच्या दहा दिवस आधीच विल्यम्सचा जन्म झाला होता. विल्सम्य केटनेही अशीच मुद्दाम चुकीची तारीख दिली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुकींनी बाळाच्या जन्माची तारीख १७ जुलै आणि मुलगी जन्माला येणार यावरच बेटींग घेणे सुरू केले असून सध्याच्या त्याचा दर अनुक्रमे चारास एक व आठास एक असा निघाला असल्याचेही समजते.