लंडन दि.२८ – लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅप स्नॅपचॅटची आजची किंमत ८०० दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली असल्याचे आणि या बाबत त्यांनी फेसबुक व ट्विटर या लोकप्रिय सोशल साईटनाही मागे टाकले असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

स्नॅपचॅट अॅपच्या सहाय्याने युजरला फोटो शेअर करतानाच त्यात १० सेकंदानंतर तो फोटो आपोआप डिस्ट्रक्ट म्हणजे नाहिसा होण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. एव्हान स्पायगेल आणि बॉबी मर्फी यांनी २०११ मध्ये स्नॅपचॅट सुरू केले तेव्हा ही सोय त्यात नव्हती. मात्र आता युजरने स्मार्टफोनच्या सहाय्यानेही लोड केलेले फोटो अथवा व्हीडीओ १० सेकंदाच आपोआप डिलिट होतात. इतकेच नव्हे तर हे फोटो सर्व्हरमधूनही डिलिट होतात. यामुळे युजरला नेहमीच्या साईटवर येणार्या अनेक अडचणींतून मुक्तता मिळते.
स्नॅपचॅट सुरू झाले तेव्हा ६० दशलक्ष डॉलर्स अशी त्यांची किंमत केली गेली होती. मात्र आता त्यांना सोनी एन्टरटेनमेंट सारखे अनेक बडे पार्टनर मिळाले असल्याने वर्षदोन वर्षातच त्यांची व्हॅल्यू ८०० दशलक्ष डॉलर्सवर गेली आहे असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. फेसबुकच्या इन्स्टाग्रामची व्हॅल्यू ७१५ दशलक्ष डॉलर्सवर आहे तर ट्विटर ची ४०० दशलक्ष डॉलर्स आहे.