
नवी दिल्ली, दि.26 – प्रियांका गांधी- वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या मोठ्या भावाच्या पत्नी या सध्या अश्लील फोनकॉल्समुळे हैराण झाल्या आहेत. गेले सहा महिने प्रियांका गांधीच्या जाऊबाईंना अनोळखी व्यक्ती फोन करून आचकट विचकट बोलत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला हानी
करण्याचीही धमकी देत आहेत. सोनिया गांधीचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या मोठ्या भावाचा- रिचर्ड वढेरा
यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यांची पतनी सायरा वढेरा आणि त्यांची मुलं यांच्या सुरक्षेसाठी 24 तास महिला होमगार्ड तैनात असतात. गेले सहा महिने सायरा वढेरा यांना अनोळखी नंबरवरून फोन येत असून पलिकडील व्यक्ती अश्लील आणि अर्वाच्य भाषेत बोलून लागते. कधी मैत्री करण्याची ऑफर दिली जाते, तर कधी क्षेपार्ह गोष्टी बोलल्या जातात. नोकरांनी फोन उचलला, तर त्याला शिव्या ऐकायला मिळतात.